जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; महाशिवरात्रीला खंडोबा मंदिरात दर्शनास मनाई

जेजुरी – राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. करोनाबाधितांच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरांत अंशत: लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

महाशिवरात्री निमित्त जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी करोनाचे वाढते प्रमाण पाहता ही गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून म्हणजेच 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत या भागात कलम 144 जमाव बंदी लागू करण्यात आली आहे.

जमावबंदीचा कायदा तोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर खंडोबाच्या मंदिरावर पाताळ लोक पृथ्वी आणि अवकाशातील लिंगाचे दर्शनासाठी खंडोबा मंदिरावर भाविकांस सक्त बंदी करण्यात आली आहे.

तसेच या परिसरातील हाॅटेल, लाॅज मालकांना मुक्कामी बुकिंग न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेजुरी आणि पंचक्रोशीत सार्वजनिक कार्यक्रम मिरवणुकीवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.