कानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका युवकाने व्हिडिओ तयार करून आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केल्यानंतर आत्महत्या केली आहे. आपण इस्लाम धर्म स्विकारावा यासाठी पत्नी सातत्याने दबाव आणत होती. तसे न केल्यामुळे ती त्याला सोडून गेली आणि त्याच्या विरोधात तीने गुन्हाही दाखल करत त्याला अटक करवली. झालेल्या मनस्तापामुळे या युवकाने आत्महत्या केली आहे.
सदर घटनेतील २३ वर्षीय युवक शुभम वाल्मीकी हा डीजे वाजवण्याचे काम करतो. मंगळवारी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कळवल्यावर त्यांनी त्याचा मोबाइल चेक केल्यावर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तयार केलेला व्हिडिओ त्यांना आढळून आला. त्यात आपली पत्नीच आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे त्याने म्हटले होते.
तीन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शुभमने एका मुस्लिम युवतीशी विवाह केला होता. शुभमच्या पित्याच्या म्हणण्यानुसार मुलगी त्याला सातत्याने इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणत होती व यासाठी तो तयार नव्हता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते आणि ती त्याला सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर त्याच्या सासरच्या मंडळींकडूनही त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव येत होता.
पत्नीने माहेरी गेल्यावर पतीविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला तुरूंगात पाठवले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाउल उचलले. दरम्यान, शुभमने व्हिडिओत आपल्या कुटुंबाकडून लाखो रूपये हडपल्याचा आरोप पत्नीवर केला असून त्याने स्वत: पत्नीवर कधी धर्मातर करण्याचा दबाव आणला नव्हता असेही म्हटले आहे.