कोलकाता – प. बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारच्या दुर्गापूजा आयोजकांना 50 हजार रुपये मदत देण्याच्या निर्णयाबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक पूजा समितींना ही मदत देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
त्यावरील सुनावणीच्या वेळी ईद आणि अन्य सणांच्या वेळी अशा प्रकारची मदत दिली जाणार आहे का, असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उपस्थित केला.सरकारच्या तिजोरीतील पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो असा
पुजा आणि अन्य धार्मिक बाबींसाठी खर्च करण्याच्या संदर्भात कोणते निकष अथवा मार्गदर्शक तत्वे आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे. त्यावर कोविडच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्क आणि जनजागृतीसाठी ही मदत केली जात असल्याचे सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.
सरकारचे म्हणणे ऐकल्यानंतर खर्चाच्या बाबींची योग्य आखणी आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे बसून या प्रकारच्या सगळ्याच बाबींबद्दल चर्चा करण्याचे आणि त्याची माहिती न्यायालयाला देण्याचे निर्देश दिले.