अक्षयसोबत काम करण्यासाठी उत्साहित – मानुषी छिल्लर

मुंबई  – माजी ब्युटी क्‍वीन मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात सुपरस्टार अक्षयकुमारसमवेत चित्रपटाच्या सेटवर जाण्यासाठी मी उत्सुक असल्याचे तिने म्हटले आहे. “पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटातून मानुषी अक्षयसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

मानुषी म्हणाली, “पृथ्वीराज’च्या सेटवर परत येण्यासाठी मी रोमांचित आहे. मी दररोज शूट करायला तयार आहे. कारण मी यातून बरेच काही शिकणार आहे आणि मला ते आवडतेही. अक्षयसरांसमवेत सेटवर जाण्यासाठी मी खूप उत्सुक होते. कारण त्यांच्याकडून मी बरेच काही शिकले आहे आणि मला बरेच काही शिकायला मिळणार आहे.

ती म्हणाली, “मी “पृथ्वीराज’च्या टीमसोबत काम करत असल्याने स्वतःला भाग्यवान समजते. तसेच जेव्हा आपण पदार्पण करत असतो तेव्हा आपण जास्तीत जास्त सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. याप्रसंगी अक्षयसरांसह प्रत्येकजण मला सहकार्य आणि प्रोत्साहन देत आहे.

दरम्यान, “पृथ्वीराज’ हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवन आणि वीरतावर आधारित आहे. करोनाचा संसर्ग होण्यापूर्वी या चित्रपटाचे बरेच शूटिंग पूर्ण झाले होते. आता अनलॉकनंतर पुन्हा एकदा शुटिंग सुरू करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.