मुंबई – सध्या,सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले.दोघांनाही एरपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी दोघेही खूप आनंदात दिसत होते. मात्र कियाराच्या लूकवरून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
लग्नानंतर, पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि कियारा सोबत दिसल्याने चाहते चांगलेच खुश झाले आहेत. दोघांचे बाँडिंग चाहत्यांनी चांगलेच पसंत केले.मात्र काही नेटिझन्सना कियाराचा लूक आवडलेला नाही. यामुळेच अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
स्टायलिश ड्रेसमध्ये गॉगल्स लावून सिद्धार्थ कियारा एरपोर्टवर दाखल झाले होते. चाहत्यांना दोघांचाही हा लूक खूप आवडला. अनेकांनी त्यांचे कौतुकही केले.मात्र काहींनी थेट कियाराला टार्गेट करत ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
नेटिझन्स अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल करत आहेत आणि विचित्र कमेंट करत आहेत. एका युजरने हे अजूनही बॅचलर आहेत का ? असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने कियाराने मंगळसूत्र का घातले नाही? असा सवाल कमेंट करत उपस्थित केला आहे.
View this post on Instagram
कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या संगीत समारंभाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. यासोबतच त्यांनी जोरदार डान्स केल्याचेही समजते.सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाह बंधनात अडकले होते.