मुंबई – कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऍटिट्यूडपासून तिच्या फॅशन सेन्सपर्यंत, कियाराच्या प्रत्येक हालचालीवर चाहते नजर ठेऊन असतात. आता कियारा तिच्या एखाद्या पोस्टमुळं किंवा आगामी प्रोजेक्टमुळं चर्चेत आलेली नाही. तर कियारा तिच्या ड्रीम कार साठीच्या खरेदीमुळं चारसहत आली आहे.
कियारा अडवाणी पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत सुट्टीसाठी जपानला गेली होती. दोघेही गेल्या आठवड्यातच मुंबईत परतले आहेत. सुट्टीवरून परतताच अभिनेत्री तिच्या कामात व्यस्त झाली. अशात कियारा तिच्या एका डबिंगसाठी मुंबईतील स्टुडिओबाहेर स्पॉट झाली. यावेळी तिच्या नव्या कारणे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज मेबॅक कारमधून उतरते.इतक्यात कारसमोर उभे असलेले माध्यम कर्मी तिचे अभिनंदन करायला सुरुवात करतात. यावेळी अनेकांनी अभिनेत्रीचे नव्या कारसाठी अभिनंदन केले. कियारा अडवाणीच्या कारची किंमत करोडोंमध्ये आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या या मर्सिडीज मेबॅकची किंमत जवळपास 3 कोटी रुपये आहे.
कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल अभिनेत्री सत्यप्रेम चित्रपटाच्या प्रमोशनसह पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त असल्याचे समजते. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात कियारासोबत कार्तिक आर्यन देखील झळकणार आहे. तर सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. सत्यप्रेम की कथा 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.