कतार – येथे रविवारी झालेल्या फिफा विश्वचषकच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रान्सचा रोमांचक सामना जगभरातील फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळाला. या सामन्यात शेवटच्या क्षणाला पेनल्टी शूटआऊटवर अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या सामन्याच्या निकाल पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, सामन्याच्या निकाल लागायला तयार नव्हता. कारण सामना आगोदर निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशा बरोबरोत राहिला. त्यानंतर अतिरिक्त ३० मिनिटांच्या वेळेतही सामना ३-३ अशाच बरोबरीत राहिला. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. दरम्यान, या अंतिम सामन्यापेक्षा भारतात दीपिका पदुकोणच्या नावाचीच जास्त चर्चा सुरु आहे.
एव्हढ्या मोठ्या जागतिक स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरणासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जगभरात अनेक मोठे स्टार अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत. मात्र, यासर्वांमध्ये हा मान दीपिका पदुकोणला मिळणे हे भारतासाठी अभिमानास्पद आहे. दीपिकाबरोबर स्पॅनिशचा माजी गोलकिपर एकर कसिलास हा देखील या अनावरणासाठी उपस्थित होता. विशेष म्हणजे, दीपिकाचा फुटबॉल खेळाशी दूरपर्यंत कसलाही संबंध नाही तरीदेखील तिला हा मान मिळणे सर्वांसाठी आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे.
दीपिका पदुकोणच्या हस्ते अनावरण
कालच्या दिवसभरात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी आणि भारताची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली. जवळपास ६.१७५ किलो वजनाची ही ट्रॉफी १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. या ट्रॉफीला प्रत्येक व्यक्ती स्पर्श करू शकत नाही. काही खास लोकांनाच या ट्रॉफीला स्पर्श करण्याची परवानगी असते. त्यामुळे अशा ट्रॉफीचे अनावरणच हे दीपिका पदुकोणच्या हस्ते होणे ही खूप मोठो गोष्ट आहे. अशा प्रकारचा मान प्रथमच एखाद्या भारतीयला मिळाला आहे. आगोदर प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवातदेखील दीपिका पदुकोनने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दीपिका पदुकोण जागतिक स्तरावरील लग्जरी ब्रँड लुई विटॉनची ब्रँड अँबेसिडर आहे. याच ब्रँडने ट्रॉफी ज्या केसमध्ये ठेवण्यात आली होती. त्या केसचं डिझाइन केलं होतं तसेच ती केसही लुई विटॉन ब्रँडची होती. त्यामुळे या ट्रॉफीच्या अनावरणासाठी दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली होती.
View this post on Instagram
‘पठाण’वरून वाद
दीपिका पदुकोण तिच्या आगामी चित्रपट पठाणमधून चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून समाजातील काही लोकांनी वादाला तोंड फोडले. त्यामुळे दीपिकाही या वादात सापडली आहे. गाण्यात तिने ‘भगव्या’ रंगाची बिकिनी परिधान केल्याने त्याच्या जोरदार निषेध केला गेला. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप अनेक हिंदू गट आणि राजकारण्यांनी केला असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबतच शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे मुख्य भीमीकेत दिसणार आहे. २३ जानेवारीला ‘पठाण’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.