नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला भेट देणार होते, परंतु भाजप खासदार ब्रिजभुषण यांनी आम्ही राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही असे म्हटले होते. तसेच “राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत’ असं म्हणत त्यांनी टीका केली होती.
दरम्यान यावर बृजभूषण सिंह यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. राज ठाकरे विरोध करत नाहीत ही चांगली गोष्ट आहे असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
बृजभूषण सिंह म्हणाले,“राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध होता. मी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली होती की, संतांची, जनतेची, पंतप्रधानांची माफी मागा. आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य कऱण्यास मी सांगितलं होतं. माझ्या दौऱ्याला ते विरोध करणार नसतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” अस सिंह यांनी म्हटलं आहे.