दापोडी, (वार्ताहर) – पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडीकडे जाणार्या रस्त्यावर स्थापत्य विभागाच्या वतीने गरजेनुसार गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. यामुळे दापोडी परिसरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
दापोडी चर्च येथे रोडवर असलेला गतिरोधक रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेकांना याचा त्रास होत होता. अनेकदा या मार्गावर नव्याने प्रवास करणार्या वाहनचालकांना येथील गतिरोधक लक्षात न आल्याने वाहने आदळत होती. अनेकदा लहान मोठे अपघात घडत होते.
त्यामुळे येथील गतिरोधकावर पट्टे मारण्याची मागणी आपचे यल्लाप्पा वालदोर यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने येथील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रकाशात येथील गतिरोधक लक्षात येत असल्याने वाहनाचा वेग कमी केल्याने वाहने रस्त्यात अपटत नाहीत. परिणामी वाहनांचे नुकसान होत नाही.