मुंबई – लॉकडाऊनच्या दरम्यान सोनूने गरजूंना केलेल्या मदतीची देशभर प्रशंसा करण्यात आली होती. हे काम सध्याही सुरू असून त्याने आणखी एक ट्विट करत वाढदिनी परप्रांतीयांना खास भेट दिली आहे. त्याने घोषणा केली आहे की, तो आता परप्रांतीयांना रोजगार देण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी त्याने एक ऍपही लॉंच केले आहे. मात्र सोनू सूदच्या कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले,’,सोनू सूद असा फार मोठा कलाकार नाहीये . सोनू सूदला हे फायनान्शिअल बॅकिंग (आर्थिक मदत) आलं कुठून? मला हे कळत नाही. मदत करण्याची इच्छा प्रत्येकाच्या असतात. मात्र, आर्थिक मुद्यावर सर्वच आपल्या क्षमतेनुसार मदत करत असतात.’
ते पुढे म्हणाले ,’सोनू सूदकडे ही आर्थिक बाजू आली कुठून? आपल्या थोडसं या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. सध्या तरी याचा थांगपत्ता लागत नाहीये. तो करतो हे चांगलं करतोय. केलंही असेल. परंतु हे एकट्या सोनू सूदच एकट्याच काम नाही, असं मला वाटत नाही. येत्या काळात कळेल आपल्याला यामागे काय काय डोकी होती. ,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सोनू सुदवर या कार्यक्रमात हल्लाबोल केला.
पैसा कुठून आला या पेक्षा त्याने मदत केली हे महत्वाचं आहे.. आपल्याकडे पैसा असून आपण काहीच करत नाहीत