‘क्वारंटाईनमधील रजा वेतन कपातीसाठी ग्राह्य धरता येणार नाही’

डॉक्टरांच्या वेतन कपात प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 'या' चार राज्यांना फटकारले

नवी दिल्ली – करोना व्हायरसने देशभरात थैमान घातले असून डॉक्टर्स जीवाची पर्वा न करता या युद्धात उतरले आहेत. मात्र, डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा, सुविधा आणि वेतनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चार राज्यांना फटकराले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब आणि कर्नाटक राज्यांना डॉक्टरांना वेतन न दिल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांचा क्वारंटाईनमधील कालावधी सुट्ट्याच्या स्वरूपात धरल्याने त्यावरही प्रश्न उपस्थित केले आहे. डॉक्टरांचा क्वारंटाईन कालावधी रजा घोषित करून वेतन कपात करता येणार नाही. तसेच त्यांना पगार वेळेवर मिळेल याची खात्री करण्यास केंद्र सरकारला सांगितले आहे.

त्रिपुरा, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये डॉक्टरांना आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या अधिकऱ्यांना सुट्टी द्यावी. सोबतच वेतन आणि भत्ते वेळेवर दिले जावेत. राज्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे. याप्रकरणी केंद्र सरकार कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले कि, क्वारंटाईन कालावधी ही कोणीतही सुट्टी नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.