पुणे – शुक्रवारच्या विक्रमी पावसानंतर पुणेकर सावरत नाहीत, तोच सोमवारी रात्री अतिमुसळधार पावसाने पुणे आणि पिंपरी चिंचवडला झोडपले. पावसाचा आवेग इतका प्रचंड होता, की काही मिनिटांत रस्ते पाण्याखाली गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर 9 ते 11 कि.मी. उंचीचे ढग होते. त्यामुळे कमी काळात मुसळधार पाऊस झाला. हे प्रमाण हंगामातील उच्चांकी ठरले असून, 2 तासांत 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
याबाबत हवामान तज्ज्ञ अनुराग कश्यपी यांनी माध्यमांशी बोलतांना सविस्तर माहिती दिली आहे ते म्हणाले,’ हा परतीचा पाऊस असला तरी आक्टोबर महिन्याच्या शेवट पर्यंत संपणार आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ