मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.
View this post on Instagram
मराठी चित्रपटसृष्टीतील हॉट अभिनेत्री म्हणून मानसी नाईक नेहमीच सोशल मीडियावर तिच्या अदांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असणारी मानसी तिच्या चाहत्यांना तिचे नवे अपडेट शेअर करत असते. मात्र शेअर केलेल्या एका फोटोवर ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला तिने सडे तोड उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
एका युजर्सने “तू बुधवार पेठेतील रां** आहेस” अशी कमेंट मानसीच्या फोटोवर केली असता मानसीने प्रश्न वजा उत्तर दिले,’तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? आणि तुम्ही तेथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या बायका चालवतात त्या बायका स्वत:चं पोट भरण्यासाठी काम करतात. प्रामाणिकपणे काम करतात.’ ‘पण दुसऱ्यांना आशा भाषेत शिव्या घालून तुम्हाला काय मिळतं?’ असा सवाल मानसीने त्या यूजरला केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मानसीने १९ जानेवारी २०२१ रोजी बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्न केले. नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते. पण लग्नानंतर देखील मानसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.