मुंबई – गेल्या वर्षी भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
अशातच खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती दिली आहे. या माहितीनंतर आता खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तमाध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले,’मला याबद्दल कल्पना नाही.’ असं म्हणत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.