नंदुरबार – नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. बाजार समितीत 973 या गव्हाच्या वाणाला विक्रमी दर मिळाला आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
गव्हाने बाजार समितीत 5 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत गव्हाच्या वाणानुसार दर ठरत आहेत. बाजार समितीत सध्या गव्हाला 2 हजार 200 ते 5 हजार 451 रुपयांचा दर मिळाला आहे. बाजार समितीत दररोज 4000 क्विंटल गव्हाची आवक होत आहे. त्या दृष्टीने बाजार समितीच्यावतीने लिलावाचे नियोजन करण्यात येत आहे. गव्हाची वाढती किंमत पाहता ब्रेड आणि गव्हापासून तयार होणाऱ्या इतर वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे.