सांगली – सांगलीत पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामचंद्र बिरणगे (वय 46, रा. विश्रामबाग पोलीस लाईन) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बिरणगे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस अधिक तपास करत आहे.
रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून काम करतात. चार दिवसापूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी आरती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत त्यांनी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार सुजाता हेगडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर रामचंद्र बिरणगे यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.