सावधान ! व्हॉट्‌स ऍप प्रायव्हसीची दाणादान; गुगलवर लीक होतेय प्रायव्हेट चॅट

नवी दिल्ली – नवीन सेवा आणि मान्य न होणाऱ्या अटींमुळे चर्चेत आलेल्या व्हॉट्‌स ऍपमुळे आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्‌स ऍपवरील प्रायव्हेट ग्रुपचे मॅसेज गुगल सर्च इंजिनवर लीक झाले आहेत. हे मॅसेज कोणीही वाचू शकत असून यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीची दाणादान उडाली आहे.

गुगलवर कोणाही व्हॉट्‌स ऍप ग्रुप सर्च करून तुमचं चॅट वाचू शकतं. या व्यतिरिक्त तुमचे प्रायव्हेट ग्रुपही जॉईन करू शकतात. लोकप्रिय इंस्टंट मॅसेजिंग ऍप व्हॉट्‌स ऍपच्या या चुकीमुळे व्हॉट्‌स ऍप ग्रुपमधील सर्व सदस्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक होत आहेत. याआधी 2019 मध्ये देखील व्हॉट्‌स ऍपचा डेटा लिक झाला होता. त्यावेळी व्हॉट्‌स ऍपने या त्रुटी दूर केल्या होत्या. त्यावेळी व्हॉट्‌स ऍपच्या या त्रुटींची सायबर सिक्‍युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी माहिती दिली होती.

यावर व्हॉट्‌स ऍपच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले होते. मार्च 2020 पासून व्हॉट्‌स ऍपने सर्व लिंक केलेल्या पेजेसला नो इंडेक्‍स टॅग लावला आहे. त्यामुळे हे पेज गुगलच्या इंडेक्‍सिंगमधून बाहेर झाल्याचे व्हॉट्‌स ऍपने म्हटले होते. मात्र आता हीच समस्या पुन्हा निर्माण झाली आहे. यावेळी देखील राजशेखर राजहरिया यांनी ही माहिती दिली आहे.

 

दरम्यान डेटा लीक झाल्यानंतर व्हॉट्‌स ऍपकडून दरवेळी स्पष्टीकरण करण्यात येते. मात्र व्हॉट्‌स ऍपची प्रायव्हसी दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे युजर्स आता टेलिग्राम आणि सिग्नल सारखे पर्याय निवडत आहेत. विशेष म्हणजे व्हॉट्‌स ऍपच्या नवीन अटी आणि शर्तींमुळे ऍपल ऍप स्टोअरमध्ये टॉप फ्री लिस्टमध्ये सिग्नल ऍपने स्थान मिळवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.