नवी दिल्ली : जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप आज दुपारी १२च्या सुमारास डाऊन झाले. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत.
काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नसून फक्त पर्सनल चॅटची सुविधा युजर्सला वापरता येत नसल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचे ट्विटरवर सांगितले जात आहे.
WhatsApp services have been down for the last 30 minutes. pic.twitter.com/9WL4mMFTRO
— ANI (@ANI) October 25, 2022
दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसल्यामुळे हा बिघाड नेमका कधीपर्यंत दुरुस्त होईल? याबाबत नेटिझन्स ट्विटरवर विचारणा करू लागले आहेत.
When WhatsApp is Down.#whatsappdown pic.twitter.com/xHgsHd9h8v
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) October 25, 2022
दरम्यान, हा बिघाड झाल्यानंतर लागलीच व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याबद्दल ट्विटरवर मीम्स शेअर व्हायला सुरुवात झाली आहे.
The reason behind #whatsappdown pic.twitter.com/39FWn9fYyv
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) October 25, 2022
How Twitter behaves when Meta plateforms are down #whatsappdown pic.twitter.com/jKpAjx3ANh
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) October 25, 2022
काही युजर्सनी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर नेटिझन्स ट्विटरवर आल्याचं सांगणारं मीम शेअर केलं आहे.