पुणे – शहरासह जिल्ह्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 2 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये सात दिवसांचा मिनी लॉकडाऊन लावण्यात आला. हे सात दिवस संपत आले असून, आता नवीन निर्बंध लावणार की, राज्य सरकारने लावलेले निर्बंध सुरू ठेवणार हे लवकरच स्पष्ट होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार दर शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतात. त्यानुसार आज (दि. 9) ही बैठक होणे अपेक्षीत आहे. मात्र, काही कारणास्तव ही बैठक शनिवारी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.
त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, सात दिवसांपूर्वी जाहीर शहरातील निर्बंध कडक करत मिनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामध्ये सायंकाळी सहा ते सकाळी सहा बाहेर फिरण्यास बंदी करण्यात आली.
तर केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता सात दिवसानंतर हे निर्बंध शिथील होणार का? आणखीन कडक होणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल.