बॉलिवूडला प्रेमकहाण्या नवीन नाहीत. सध्याच्या काळात अभिनेता सनी सिंह देखील एका प्रेमप्रकरणावरुन चर्चेत आहे. अलिकडेच त्याचा “उजडा चमन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटापेक्षा तो एका डेटिंगवरुन अधिक चर्चेत आहे. तो सध्या एका सुपर मॉडेलसमवेत डेटिंग करत असल्याचे सांगितले जात आहे.
यादरम्यान दोघांचे छायाचित्रही समोर आले. सनी सिंह हा काम्या वेलिवाल नावाच्या सुपर मॉडेलसममवेत दोन वर्षांपासून डेटिंग करत असल्याचे बोलले जात आहे. सनी आपल्या मॉडेलिंगच्या काळात काम्याला भेटला होता आणि काही भेटीनंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
हे प्रकरण इतके वाढले की सनीने काम्याला आपल्या कुटुंबाची ओळखही करुन दिली. घरातील मंडळी देखील या संबंधावरुन खूश होते. अलिकडेच काम्याने सनीबरोबर एक रोमॅटिंक पिक्चर देखील सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.