Rahul Gandhi – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. भाजपमध्ये घराणेशाहीचे राजकारण असल्याचा आरोप राहुल गांधींना केला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी विचारले की अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंह यांचा मुलगा काय करतो? अस उत्तर देत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्या माहितीनुसार अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपने आधी आपले नेते आणि त्यांची मुले काय करतात हे पाहावे. अनुराग ठाकूर यांच्याशिवाय घराणेशाहीच्या राजकारणाची उदाहरणे असणारे आणखी काही लोक आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरही राहुल गांधी म्हणाले की, ‘आम्ही (काँग्रेस) सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहोत. आम्ही निष्पाप नागरिकांवरील कोणत्याही प्रकारचा हिंसाचार माफ करत नाही. आम्ही सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा विरोध करतो, तो कोणी केला किंवा कसा केला याची पर्वा न करता.’
तत्पूर्वी, एक दिवसापूर्वीच राहुल गांधी निवडणूक दौऱ्यावर मिझोरामला पोहोचले होते. मिझोरम काँग्रेसने सांगितले की, ‘राहुल गांधी 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या मिझोराम दौऱ्यावर पोहोचले आहेत.