Three sadhus beaten – पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशच्या तीन सांधूना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या साधूंना मुलींना पकडणारी टोळी समजत स्थानिक लोकांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन साधूंना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहचत साधूंना जवळच्या पोलीस स्टेशनला नेले.
पुलिसांच्या माहितीनूसार, ही घटना गुरुवारची आहे. उत्तरप्रदेशच्या तीन साधूंनी मकरसंक्रात निमित्त गंगासागरला जाण्यासाठी एक वाहन भाड्याने घेतले. आणि त्यांनी प्रवासाला सुरुवात केली यावेळी ते रास्ता भटकले आणि त्यांनी तेथे उपस्थित मुलींना रस्ता विचारला यावेळी त्या मुली तेथून ओरडत पळून गेल्या यावेळी स्थानिकांनी त्या साधूंना मुलींना पकडणारी टोळी समजत मारहाण सुरु केली. या घटनेची वेलेलंत माहिती मिळताच आम्ही तेथे पोहचलो आणि नी मध्यस्थी करून साधूंची सुटका करून काशीपूर पोलीस ठाण्यात आणले’
Absolutely shocking incident reported from Purulia in West Bengal. In a Palghar kind lynching, sadhus traveling to Gangasagar for Makar Sankranti, were stripped and beaten by criminals, affiliated with the ruling TMC.
In Mamata Banerjee’s regime, a terrorist like Shahjahan Sheikh… pic.twitter.com/DsdsAXz1Ys— Amit Malviya (@amitmalviya) January 12, 2024
या घटनेवर पुरुलिया येथील पुलिस अधीक्षक अभिजीत बनर्जी यांनी सांगितले,’आम्ही या घटनेनंतर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे या हल्ल्यातील आरोपींच्या शोध घेतला जात आहे, तपासात आतापर्यन्त १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, भाजपा नेत्यांनी या घटनेवरून ममता बॅनर्जीवर निशाणा साधला आहे.भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करुन पश्चिम बंगालमध्ये पालघसारखी घटना घडल्याचा दावा केला .
मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संतप्त जमाव भगवा कपडे परिधान केलेल्या साधूंचे केस ओढत आहे. साधूंना निर्वस्त्र करुन लाठया, काठ्यांनी मारहाण केली जात आहे. साधू स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच ते दया याचनेची मागणी करत आहेत. पण संतप्त जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीय. त्यांच्याकडून मारहाण सुरु आहे. पीडित साधूसोबत भगवे कपडे घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसतोय.