पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का; आता आमदार कृष्णा कल्याणी यांनी सोडला पक्ष

रायगंज – पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला एकापाठोपाठ एक धक्का बसत आहे. आता रायगंजमधील भाजप आमदार कृष्णा कल्याणी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव सरकार यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला होता तेव्हा पासूनच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

कृष्णा कल्याणी यांना भारतीय जनता पक्षाने एक दिवस आधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रायगंजमध्ये भाजप खासदार देबश्री चौधरी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र आधल्यादिवशीच कृष्णा कल्याणी यांना आपला राजीनामा दिला आहे.

या दरम्यान ते म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीत राहू शकत नाही. ज्यामध्ये देबश्री चौधरी खासदार आहेत. मात्र ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंर्भात त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.