कोलकता – देशातील अनेक राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे वारंवार करोना लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत.
लसीकरणाच्या तुडवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर केंद्रावर नागरिकांकडून लस घेण्यासाठी हाणामारी केली जात आहे . तर काही लसीकरणं केंद्रावर नागरिकांकडून लस घेण्यासाठी गर्दी केली जात आहे.
#WATCH | West Bengal: At least 25 people were injured when a huge crowd of beneficiaries gathered at a #COVID19 vaccination centre in Jalpaiguri and a stampede followed soon after. The injured were admitted to a hospital. pic.twitter.com/uiWEPiKLa6
— ANI (@ANI) August 31, 2021
यातच पश्चिम बंगालमध्ये एका करोना लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. त्या दुर्घटनेत काही महिलांसह 25 जण जखमी झाले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील धूपगुडी आरोग्य केंद्राबाहेर सकाळपासूनच स्थानिकांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली. त्यांना प्रथम रांगेत उभे करण्यात आले. मात्र, आरोग्य केंद्राचे फाटक उघडताच रांग मोडून अनेकांनी एकाचवेळी आत जाण्याची धडपड सुरू केली.
त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. त्यातून करोनाविषयक नियमही धाब्यावर बसवले गेले. लसींच्या तुटवड्याच्या शंकेने अनेकांनी एकाचवेळी आत जाण्याचा प्रयत्न केल्याने ती दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सातत्याने मोदी सरकारकडे लसटंचाईचे गाऱ्हाणे मांडले आहे. अशात त्या राज्यात चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना तोंड फुटून राजकीय वातारवरण तापण्याची शक्यता आहे.