मुलीने नकार दिल्याने प्रियकराकडून खून व इतर अनेक घटना समोर येतात. मात्र पश्चिम बंगालमधील कटवा येथून एक अतिशय वेगळे प्रकरण समोर आले आहे. प्रेमप्रकरणातून प्रेयसीने प्रियकरावर गोळ्या झाडल्या आहेत.
प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. या एका कारणावरून प्रेयसीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रेयसीचा शोध सुरू केला आहे, तर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कटवा येथील बागन पाडा येथील मनीषा खातून हिने तिचा प्रियकर केसिया मठपारा येथील रहिवासी लालचंद शेख याला रात्री 8.30 नंतर एका गल्लीत बोलावले. येथे दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. यानंतर मनीषाने लालचंद याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लालचंदने लग्नास नकार दिला. त्यानंतर मनीषाने लालचंद यांच्या गालावर किस करून गोळ्या झाडल्या. गोळी लालचंदच्या जॅकेटला स्पर्श करत निघून गेली. यानंतर मनीषा घटनास्थळावरून बेपत्ता झाली.
लालचंदने सांगितले की, मनीषाचे त्याच्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण मधल्या काळात मनिषाचे दुस-या कोणाशी तरी अफेअर होते. हे कळताच लालचंदने मनिषाकडे पाठ फिरवली. त्याचवेळी मनीषाही कटवा सोडून झारखंडमध्ये राहू लागली. मंगळवारी मनीषा पुन्हा काटव्याला आली आणि तिने लालचंदला भेटायला बोलावले. याच दरम्यान ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लालचंदला मनिषासोबत संबंध ठेवायचे होते मात्र तिने असे करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने जबरदस्ती केली म्हणून लालचंदच्याच बंदूकीमधून मनिषाने गोळ्या झाडल्या असा आरोप मनिषाच्या घरच्यांनी लावला आहे. पोलिस पुढिल तपास करत आहेत.