नवी दिल्ली – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरून धवन, सनी देओल यानी कोरोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
अक्षय कुमार
करोनाविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभिनेता अक्षय कुमार याने २५ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ट्विटवरुन अक्षयने ही माहिती दिली.
This is that time when all that matters is the lives of our people. And we need to do anything and everything it takes. I pledge to contribute Rs 25 crores from my savings to @narendramodi ji’s PM-CARES Fund. Let’s save lives, Jaan hai toh jahaan hai. ?? https://t.co/dKbxiLXFLS
— Akshay Kumar (@akshaykumar) March 28, 2020
वरून धवन
वरुणने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरुणने ही घोषणा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही वरुणने व्यक्त केला.
I pledge to contribute 30 lakhs to the PM CARE fund. We will over come this. Desh hai toh hum hain. https://t.co/E87IU22NaF
— Varun Dhawan (@Varun_dvn) March 28, 2020