आळंदी – देहू-आळंदी रस्त्यावर आळंदी हद्दीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने भव्यदिव्य, आकर्षक अशी स्वागत कमान उभारली आहे. आळंदी नगरपरिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे व खाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपले आभारी आहे, अशी स्वागत व आभारकमान दोन्ही बाजूने उभारल्याने आळंदीच्या वैभवात भर पडली आहे.
याचबरोबर आळंदीला जोडणाऱ्या चारही बाजूंचा रस्त्यांवर अशा कमानी त्या त्या महानगरपालिका, नगरपालिका ग्रामपंचायत यांनी उभाराव्यात, असे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले.
नगरसेवक सचिन गिलबिले यांनी तीन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तसेच तत्कालीन महापौर नितीन काळजे यांच्याकडे निवेदनाद्वारे स्वागत कमानीची मागणी केली होती.