पुणे – रेल्वे प्रशासनाकडून 6 फेब्रुवारीपासून पुण्याहून हबीबगंजसाठी साप्ताहिक विशेष हमसफर एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात येणार आहे.
जूनपासून रेल्वेकडून विशेष प्रवासी गाड्या सोडण्यात येत असून, या गाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देखील पुणे-हबीबगंज-पुणे या मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
6 फेब्रुवारीपासून हबीबगंज-पुणे साप्ताहिक विशेष हमसफर एक्स्प्रेस दर शनिवारी धावणार आहे. तर, 7 फेब्रुवारीपासून पुणे-हबीबगंज साप्ताहिक विशेष हमसफर एक्स्प्रेस दर रविवारी दुपारी 3.15 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी 4.45 वाजता हबीबगंज येथे पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी आदी ठिकाणी थांबणार आहे.