पुणे – मध्य रेल्वे पुणे विभागाच्या वतीने पुणे-लोणावळा दरम्यान इंजिनिअरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवार (दि. ७) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे-लोणावळा-पुणे या दरम्यानच्या लोकल गाड्या त्यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
एमजीआर चेन्नई-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (ट्रेन क्रमांक १२१६४) ही सुपरफास्ट एक्स्प्रेस दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी रेग्युलेट करण्यात येणार आहे. पुणे-लोणावळा दरम्यान मेंटेनन्स तसेच पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
अप उपनगरीय गाड्या रद्द :-
१) पुण्याहून लोणावळासाठी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द.
२) पुण्याहून लोणावळासाठी सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द.
३) पुण्याहून लोणावळासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द.
४) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द.
५) पुण्याहून लोणावळासाठी सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द.
६) शिवाजीनगर वरून लोणावळासाठी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द.
डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-
१) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द.
२) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द.
३) तळेगाव येथून पुण्यासाठी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द.
४) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द.
५) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द.
६) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द.