नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील तीसरा अर्थसंकल्प सादर केला. इतिहासात पहिल्यांदा हा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
तर दुसरीकडे सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशीच महागाईचा मोठा फटका बसला आहे. अर्थसंकल्पाआधीच इंडियन ऑइलने कमर्शिअल एलपीजी सिलिंडर च्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. 19 किलोग्राम कमर्शिअल एलपीजी सिलिंडरची किंमत 190 रूपयांनी वाढवण्यात आली आहे. दिलासादयक म्हणजे यावेळी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
IMP NEWS Budget 2021 : कोणत्या वस्तू होणार ‘महाग’, कोणत्या ‘स्वस्त’ ? पाहा संपूर्ण यादी
दरम्यान, यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत दोन वेळा 100 रूपयांनी वाढ केली होती. कंपनीने यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रूपये आणि 15 डिसेंबरला 50 रूपयांनी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या होत्या.