मागील काही वर्षांत वाहन उद्योगातील परिवर्तनाने वेग धारण केला आहे. 2017 ते 2018 मध्ये जागतिक ईव्ही विक्री 65% नी वाढली. या काळात 2.1 दशलक्ष वाहने तयार झाली. 2019 मध्ये ही वाढ सुरूच राहिली. कोरोना उद्रेकामुळे 2020 मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व 25% कमी झाली.
ब्लूमवर्ग न्यू एनर्जी फायनान्स (बीएनईएफ) नुसार या अडचणीनंतरही ईव्हीची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यात सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (आयसीई) वाहनांनुसार किंमत अशी वैशिष्टये आहेत. 2025 पर्यंत जगभरातील प्रवासी वाहनांची विक्री 10% नी वाढेल. 2030 मध्ये ती 28 टक्के तर 2040 पर्यंत 58 टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे या कार कंपन्यातील गुंतवणूकीतील परतावाही वाढणार आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊयात आगामी काळात रस्त्यावर अवतरणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारबद्दल.
एमजी सायबर्स्टर : जगातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक सुपर स्पोर्टस गेमिंग कॉकपीट एमजी सायबर्स्टरची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणार आहे. एक्सटेरिअरमध्ये एमजी सायबर्स्टररने टिकाऊ एमजीबी रोडस्टर्स क्लासिक कन्हर्टेबल बॉडी स्टाइल असून सॉलीड स्पोर्टस कार पोश्चर मिळते. विंडहंटर फ्रंट फेस डिझाइन हे अगदी वेगळे व ठसा उमटवणारे आहे. मोड्युलर बॅटरी (सीटीपी) टेक्नोलॉजी असल्याने 800 किमीचा अल्ट्रा लॉंग एंड्युरन्सदेखील मिळतो. ती 0-100 किमी/तास वेग फक्त 3 सेकंदात धारण करण्यास सक्षम आहे. यात ऑटोनॉमस एल3 इंटेलिजंट ड्रायव्हिंग सिस्टिम आहे. एमजी सायबर्स्टर ही केवळ संकल्पनाच नसून, ती उत्पादित होणार आहे.
टेस्ला मॉडेल 3 : टेस्लाने अखेर बहु प्रतीक्षित कारची पहिली आवृत्ती उत्पादित केली. हे प्रीमियम रेंज मॉडेल, 44,000 डॉलर मध्ये उपलब्ध असून 500 किमी/310 मैलांपर्यंत पोहोचते. या रेंजमध्ये प्रथमच एवढी किफायतशीर किंमत देण्यात आली आहे.
वोल्वो एक्ससी40 रिचार्ज : वोल्वोने पहिली पूर्ण इलेक्ट्रिक एक्ससी40 रिचार्ज कार ऑक्टोबर 2019 मध्ये आणली असून त्यात अनेक सुविधा आहेत. गूगलच्या नव्या अँड्रॉइड ऑटोमेटिव्ह सॉफ्टवेअर सपोर्टेड इन्फोटेनमेंट सिस्टिम यात आहे. टेस्लाकडून प्रेरणा घेत, वोल्वोने तयार केलेली ही पूर्ण इलेक्ट्रिक कार बाजाराला धक्का देऊ शकते. रेंज: 400 किमी/250 मैल. किंमत: 45,600 डॉलर(अंदाजे)
ऑडी ए9 ईट्रॉन (प्राथमिक नाव) : 2018 मध्ये ऑडी एसयूव्ही लॉंच केल्यानंतर ऑडी पूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी सेडान 2024 पर्यंत लॉंच होण्याची अपेक्षा आहे. ए9 ईट्रॉन हे ऑडीचे कॉम्बॅट टेस्लाचे मॉड़ेल एस आहे. या कारमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंगचीही सुविधा असेल. ऑडीच्या प्रमुखांनी घोषणा केली की, बॅटरीवर चालणाऱ्या सर्व ऑडीकारपैकी 25% कार मालकी घेण्याची कंपनीची योजना आहे.
बीएमडब्ल्यू एक्स3/बीएमडब्ल्यू4 सीरीज जीटी : बीएमडब्ल्यूने त्यांच्या आय 5 योजना रद्द केल्या असून आता एक्स3 आणि 4 सीरीज जीटीसारख्या इतर सीरीजचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर ते भर देत आहेत. बीएमडब्ल्यूच्या कॉम्बॅटनंतर टेस्लाचे मॉडेल 3 हे लवकरच लॉंच होण्याचा अंदाज आहे.