नवी दिल्ली, दि. 3- विविध शहरातील निर्बंधांमुळे मॅन्युफॅक्चरिंग उत्पादकता वाढीचा वेग मंदावला आहे एप्रिल महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय 55.5 टक्के नोंदला गेला आहे. मार्च महिन्यामध्ये हा निर्देशांक 55.4 टक्के होता.
समाधानाची बाब म्हणजे हा निर्देशांक अजूनही 50 अंकांच्या पुढे आहे.
हा निर्देशांक 50 अंकाच्या पुढे असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. याचा अर्थ निर्बंधाच्या काळातही कारखान्यातील उत्पादन बऱ्यापैकी चालू आहे. मात्र आगामी काळामध्ये जर निर्बंधात आणखी वाढ झाली तर कारखान्याच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.
त्याचबरोबर हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्कीट संस्थेने म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या किमती जुलै 2014 नंतर प्रथमच उच्च पातळीवर गेल्या आहेत. त्यामुळे वस्तूच्या किंमती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे.