CoronaDeath : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचे करोनाने निधन

नवी दिल्ली – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची कन्या योगिता सोलंकी यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. करोनावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 43 वर्षांच्या होत्या.

योगिता सोलंकी यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून इंदौरच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुलती नर्मदाबेन मोदी यांचाही गेल्या आठवड्यात करोनाने मृत्यू झाला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील कुमार मोदी यांच्या भावाचेही काल करोनाने निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.