नवी दिल्ली – एनडीटीव्हीचे शेअर्स नावावर करण्यासाठी अदानी समूहाने सेबीची अनुमती घ्यायला हवी होती. आमच्या परस्परच त्यांनी हा व्यवहार केला असून तो व्यवहार आम्हाला मान्य नाही, असे एनडीटीव्हीचे म्हणणे असले तरी अदानी समूहाने मात्र हा दावा फेटाळला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा स्वरूपाच्या व्यवहाराला सेबीची अनुमती घेण्याची गरज नाही.
भाजप नेत्या सोनाली फोगट यांची हत्या? दोघांना अटक; गोवा पोलिसांकडून रात्रभर चौकशी
एनडीटीव्हीची मालकी आरआरपीआर कंपनीकडे आहे. या कंपनीचे शेअर्स अदानी समूहाच्या विश्वप्रधान कमर्शिअल प्रा. लि. कंपनीने विकत घेतले आहेत. यासाठी जी प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्यासाठी सेबीच्या अनुमतीची गरज नाही, असे अदानी समूहाचे म्हणणे आहे. या करारातील जबाबदाऱ्यांचे पालन करणे ही आरआरपीआर कंपनीची जबाबदारी आहे, असेही अदानी समूहाने म्हटले आहे.
“या’ कारणांमुळे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला राजीनामा, काॅंग्रेसला मोठा धक्का
एनडीटीव्हीच्या मालकांचे असे म्हणणे आहे की, आम्ही सन 2009 मध्ये रिलायन्स समूहातील एका कंपनीकडून 250 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ही कंपनी अदानी समूहाने विकत घेतली व त्या कर्ज रकमेचे शेअर्समध्ये रूपांतर केले आहे. या कामासाठी त्यांनी सेबीची अनुमती घेणे बंधनकारक आहे. सेबीने या आधीच म्हणजे 27 नोव्हेंबर 2020 मध्ये आरआरपीआर कंपनीचे मालक राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांना रोखे बाजारात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.
भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक – शिवसेना