मुंबई- देशातून आणि परदेशातून संमिश्र संकेत आल्यामुळे बुधवारी शेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा आल्या. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सा 162 अंकांनी म्हणजे 0.40 टक्यांशे नी वाढून 40,707 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 40 अंकांनी वाढून 11,937 अंकांवर बंद झाला.
दिवसभरात सेन्सेक्स 825 अंकानी कमी-जास्त झाला. एलकेपी सेक्युारिटीचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन म्हणाले की, कर्जावरील व्याज माफ होण्याबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर शेअरबाजार निर्देशांक अस्थिर झाले.
अमेरिकेत नवे पॅकेज मिळण्याची शक्याता आहे. मात्र, निर्णय लवकर होत नाही. या कारणामुळे जागतिक शेअरबाजारातून संमिश्र संकेत आले. आज झालेल्या नफेखोरीचा टीसीएस, नेस्ले, रिलायन्स, एचसीएल टेक या कंपन्यांना फटका बसला.
कोणत्या कंपन्या तेजीत
आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, पावर ग्रीड, एचडीएफसी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बॅंक, एअरटेल.
………,