पुणे: खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असून खडकवासल्या पाठोपाठ पानशेत धरणही शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. पानशेत धरण सध्या ९५ टक्के भरले आहे. आज रात्री आठ वाजता खडकवासला धरणातून पुन्हा १३९८१ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, डेक्कन येथील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या रहिवाश्याना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.