श्रावण विशेष : मुरुम येथील अतिप्राचीन मल्लिकार्जुन मंदिर

96 लाखांची लोकवर्गणी गोळा करून दिला नाविन्यपूर्ण आकार

– तुषार धुमाळ

वाघळवाडी – मुरूम (ता. बारामती) येथे अतिप्राचीन मल्लिकाकार्जुनाचे मंदिर आहे. मागील दोन वर्षांत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुरूम ग्रामस्थांनी जिल्ह्यात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करत गटतट विसरून तब्बल 96 लाख रुपये लोक वर्गीणीतून जमा करून मंदिराला नाविन्यपूर्ण आकार दिला आहे.

श्रावण महिन्यात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होते. दक्षिण वाहिनी नीरा नदीच्या तीरावर हिरव्यागार झाडीत हे मंदिर वसलेले आहे. मुरूम गावात नीरा नदीकाठी कोळी नागरिकांची वस्ती होती भगवान शंकर या ठिकाणी भिल्लाच्या रुपात यायचे आणि याच ठिकाणी बसायचे. कोळी नागरिकांनी त्यांची मनोभावे सेवा केली.तेव्हा पासून या मंदिराला मल्लिकाकार्जुन असे नाव पडले, अशी मंदिराची आख्यायिका सांगितली जाते.

काशीखंड या ग्रंथात मुरूमच्या मल्लिकाकार्जुन मंदिराचा संदर्भ आहे. पेशवेकाळात पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर मुरूम ग्रामस्थांनी 1995 नंतर आतापर्यंत तीनवेळा जीर्णोद्धार केला. त्या काळात 33 फूट उंच शिखर होते आता ते 52 फूट इतके उंच बांधले आहे, पूर्वी 22 तोळे सोने कळसामध्ये वापरण्यात आले होते त्यात नंतर 3 तोळे भर टाकून आता 25 तोळे झाले आहे. सूर्यनारायण, राम-लक्ष्मण-सीता, गणपती, विठ्ठल रुक्‍मिणी, सटवाई माता ही देखील मंदिर आहेत. त्याचबरोबर दर सोमवारी दूध, केळी, खिचडी तर दर आमावस्याला महाप्रसाद असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.