पुणे- येत्या रविवारी (दि.27) महावितरणकडून भामा-आसखेड धरण परिसरात तातडीची विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे धरण परिसरातील असलेल्या महापालिकेच्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने या दिवशी नगररस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी (सोमवारी) उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा राहणार आहे.
बंद असणारा भाग
लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा आणि इतर.