पाचगणी (प्रतिनिधी) – करोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक बाबींशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना असतानाही संचारबंदीचे उल्लंघन करुन लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पाचगणी येथील सिद्धार्थनगरमध्ये मोकाट फिरणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र पाचगणी येथे काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी येथील सिद्धार्थनगर येथील सिद्धार्थ सेवा संघाच्यावतीने परिसरात 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
हे सर्व कॅमेरे मंडळाचे अध्यक्ष रंजन कांबळे, उपाध्यक्ष अरुण कांबळे, प्रकाश कुदळे, निकील वनने, विशाल खरात, सतीश पवार, पांढरीनाथ सोनवणे, कुमार कदम, गौतम गंगावणे, अशोक सपकाळ, अजय कांबळे, सुनील कांबळे, रवींद्र राजपुरे, अशोक चव्हाण यांच्या सहकार्याने हे बसवण्यात आले आहेत.