योद्धा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वाई – गंगापुरी, वाई येथील योद्धा प्रतिष्ठान वाई व साईब्राईट मित्र मंडळ मुंबई यांच्यावतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप साईब्राईट मित्र मंडळ मुंबईचे संचालक विलास उत्तेकर, संजय पालांडे, ऍड. अमोल लांडगे, रमेश राऊत, अविनाश सावंत, सचिन सावंत, दिलीप डोंबवलीकर, विष्णूवंत पिसाळ, किशोर शिंदे, आकाश पवार, प्रितम भूतकर, योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणवीर गायकवाड, यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या सदस्या मेघा सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते 110 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

योद्धा प्रतिष्ठान हा उपक्रम गेली 4 वर्षे सातत्याने राबवत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतिची स्कूल बॅग, वह्या, पॅड, कंपास, पेन, पेन्सिल, पाटी, वॉटर बॉटल आदी साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नुकत्याच झालेल्या उन्हाळी सुट्टीमध्ये योद्धा प्रतिष्ठानच्यावतीने मुले व मुलींसाठी मोफत चार दिवसीय उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये व्यक्तीमत्व विकास, नाट्य-अभिनय, नृत्य, स्केचिंग, अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले व या शिबिराचा 130 विद्यार्थ्यांनी लाभ घेतल्याची माहिती अध्यक्ष रणवीर गायकवाड यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणवीर गायकवाड व सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.