वडी ः कृषिदूतांचे स्वागत करताना ग्रामस्थ.
वडूज – खटाव तालुक्यातील वडी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचे आगमन झाले. वडी ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानच्या दादासाहेब मोकाशी कृषी विद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आले आहेत. सुमारे तीस प्रात्यक्षिकांसह शेतीतील नवीन तंत्रज्ञान, माहिती व त्यांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाणार आहेत. यात शहानवाज पठाण अविनाश काळे, प्रतिक भालशंकर, रोहित मधु बाला रेड्डी, नैतिक बिराजदार, आकाश करंडे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्राचार्य एस. एम.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.एस.जी.कांबळे व कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही. टी. बागल काम पाहत आहेत. कृषिदूतांचे स्वागत सरपंच अनिल सुर्यवंशी, उपसरपंच रविंद्र ननावरे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.