रोटरीतर्फे “मुली वाचवा पाणी वाचवा’ बुलेट रॅली

कराड – रोटरी डिस्ट्रीक्‍ट 3132 च्या मुली वाचवा पाणी वाचवा या संदेशात्मक बुलेट रॅलीचे स्वागत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेविका विद्या पावसकर, डॉ. राहुल फासे, वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड तसेच रोटरी क्‍लबचे पदाधिकारी व कराडकरांनी दत्त चौकात स्वागत केले.

रॅलीची सुरुवात 16 जून रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर शहरातून झाली. या रॅलीमध्ये सोलापूर शहरातील 20 व्यावसायिक, बुलेट रायडर म्हणून सहभागी झाले. ही रॅली पुढील चार दिवसांत सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील 18 गावांतून फेरी करत तब्बल 800 कि. मी. चा प्रवास करणार आहे. या रॅलीचे सर्व नियोजन डिस्ट्रीक्‍ट डायरेक्‍टर व या प्राजेक्‍टचे चेअरमन रोटेरीयन डॉ. सुभाष पाटील यांनी डिस्ट्रीक्‍ट गव्हर्नर रोटेनियन विष्णु मोंढे यांचे मार्गदर्शनाखाली केले. या रॅलीचे वैशिष्ठ्य म्हणजे बुलेट रायडर म्हणून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

कराड शहरातून गुरुवारी ही रॅली सायंकाळी साडेसहा वाजता कोल्हापूर नाका येथून सुरु झाली. या रॅलीचे नियोजन रोटरीचे अध्यक्ष डॉ. राहुल फासे व सचिव प्रबोध पुरोहित यांचे मार्गदर्शनाखाली झाले. या रॅलीमध्ये समारे ध्वनीफित असलेली रिक्षा त्यानंतर बुलेट रायडर रोटरी सदस्य व रोटरी परिवारातील महिला दुचाकीसह सहभागी झाल्या होत्या. रॅली कोल्हापूर नाका येथून सुरु होऊन पुढे दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, कृष्णानाका, बसस्थानक असे करत दत्त चौकात रॅलीची सांगता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.