वाघोली | वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचा सत्कार, उत्कृष्ट सेवा अभिलेख पदक जाहीर

वाघोली, दि.२ (प्रतिनिधी): पुणे पोलीस आयुक्तालयात असणाऱ्या लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना माननीय पोलीस महासंचालक यांचे तर्फे देण्यात येणारे उत्कृष्ट सेवा अभिलेख पदक जाहीर झाले असून त्यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद भाडळे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचा सत्कार करण्यात आला . लोणीकंद पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आपल्या हद्दीतील  वाढती गुन्हेगारी वर अंकुश मिळण्याबरोबरच पुणे नगर रोडवरील सतत भेडसावणारी वाहतूक कोंडी दूर करण्यात यश मिळवले आहे.

लोणीकंद पोलिस ठाण्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रताप मानकर यांनी भरीव कामगिरी केली आहे. सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या हेतूने अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मजूर, कामगार यांना स्वखर्चाने तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य किटचे देखील वाटप करून मानकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

एक फोन करून तातडीने नागरिकांना मदत उपलब्ध करून देणारा खाकी वर्दीतील एक आपुलकीचा माणूस म्हणून पंचक्रोशीत मानकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे  वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील ( गवळी) यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.