वाघोली – पुणे महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या होर्डिंग चालक-मालकांचे प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच यांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात होर्डिंग चालक-मालकांची बैठक घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जाणीवपूर्वक टॅक्स लादला जात असल्याची भावना
पुण्यातील बैठकीत होर्डिंग चालक-मालकांनी व्यक्त केल्या.
प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून देण्यात येत असलेल्या त्रासाबद्दल देखील माहिती मंत्री उदय सामंत यांना देण्यात आली. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. होर्डिंग चालक-मालकांचे वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी जाणीव पूर्वक त्रास देणाऱ्या काही अधिकाऱ्यांची कानउघडणी फोनद्वारे उदय सामंत यांनी केली.