सोमेश्वरनगर- अनेकदा सांगून झाल्यानंतर, पोकळ बाबुंचे फटके दिले तरी देखील मोकाट फिरणाऱ्यांचा आकडा कमी होत नाही हे पाहून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावर विनाकारण फिरून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 10 दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. वाघळवाडी, कन्नडवस्ती, मोरगाव, चोपडज, सुपे या ठिकाणी दोन दिवसांत या 10 जणांवर कारवाई करण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.