कोलकाता – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता दीदीच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करतण्यात येत आहे. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश-विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
लतादीदींच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. देशभरातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात आणि वाहतूक सिग्नलवर पुढच्या पंधरा दिवस लता मंगेशकर यांचे गाणे वाजवले जातील असा आदेश दिला आहे. ममता यांनी अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.