रायबरेली – आपला पारंपरिक मतदारसंघ रायबरेली येथून आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते अजिंक्य आहेत, असे वाटत असेल तर त्यांनी २००४ विसरू नये असे सोनिया गांधी यांनी म्हंटले आहे. २००४ मध्ये वाजपेयी यांना ते हरणार नसल्याचे वाटत होते, पण आम्ही जिंकलो असल्याचे सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले.
UPA Chairperson Sonia Gandhi on if she thinks PM Narendra Modi is invincible: Not at all. Don't forget 2004. Vajpayee Ji was invincible, but we won pic.twitter.com/0teDBtQ24G
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 11, 2019
यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, भारतीय इतिहासात असे अनेक लोक आहेत ज्यांना विश्वास आहे की ते अजिबात हरू शकत नाहीत आणि ते स्वतःला जनतेपेक्षा मोठे समजतात. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षांपासून जनतेसाठी काहीच केले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या निकालांनंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, असे राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi: There have been many people in Indian history who had arrogance to believe that they're invincible & bigger than the people of India. Narendra Modi for the last 5 yrs has done nothing for the ppl of India.His invincibility will be in full view after election results pic.twitter.com/NJ3rRFrGds
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 11, 2019