Vizzy Trophy 2023-24 – बीसीसीआयच्या आयोजित देशातील नामांकित विद्यापीठांचा सहभाग असलेली विझी करंडक या राष्ट्रीय स्पर्धेच्या पश्चिम विभागीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी धीरज जाधव याची निवड झाली आहे. गुवाहाटी येथे मार्च महिन्यात होणान्या स्पर्धेत पश्चिम, दक्षिण, पूर्व, उत्तर, मध्य विभाग संघ भाग घेणार आहेत.
या एकदिवसीय स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूचा सहभाग असणार आहे. ही स्पर्धा सर्वांत जुनी असून अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आले आहेत. या स्पर्धेद्वारे भारतातील होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या क्रिकेटच कौशल राष्ट्रीय स्तरावर सिन्ध करण्याची संधी मिळत आहे.
मला प्रशिक्षक म्हणून संधी देऊन ‘पश्चिम विभाग’ संघाला चांगली कामगिरी करण्याचे माझ्यापुढे आव्हान असणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी मिळालेल्या संधीबाबत मी बीसीसीआय व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे आभार व्यक्त करतो, असे महाराष्ट्राचा माजी रणजीपटू धीरज जाधव यांनी सांगितले.