कर्वेनगरचे प्रेक्षणीय रमाम्बिका मंदिर

आदिशक्तीची उपासना करण्याचा एक सण म्हणजेच शारदीय नवरात्र, जे नुकतेच संपले! कर्वेनगर भागातील भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले रमाम्बिका मंदिर भाविकांनी अवश्‍य भेट द्यावे असे आहे.

कारकळा, मंगळूर येथे बनवलेली रमाम्बिका देवीची मूर्ती ही एकाच काळ्या पाषाणात बनवली गेली आहे. कमळामध्ये उभी असेलेली ही देवीची मूर्ती पूर्णाकृती स्वरूपात आहे. देवीला व्याघ्रमुखाची महिरप आहे. मूर्तीच्या जवळ शिवपिंडी आहे तर प्रवेशद्वारात तुळशी वृंदावन आहे. तसेच देवळात श्रीयंत्राची प्रतिष्ठापना केली आहे. मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे असून मोठा सभा मंडप व गर्भगृह अशा दोन भागात विभागले गेले आहे.

मंदिराचे व्यवस्थापक शशांक वाड या मंदिराबद्दल माहिती देताना म्हणाले की, त्यांच्या गुरु रमा देवी यांनी मंगळूर येथे शक्तीनगर भागात रमाम्बिकेचे मोठे मंदिर बांधले होते. त्यांच्या इच्छेनुसार भक्तगणांनी पुण्यामध्ये या मंदिराची स्थापना केली. मंगळूरचे मूर्तिकार शेणॉय यांनी ही मूर्ती घडवली व 1996 साली या देवळात देवीची प्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून रोज सकाळी सुप्रभातम आणि आरती होते. संध्याकाळी 6.30 वाजता आरती होते. दर मंगळवार, शुक्रवार देवीची कुंकुमअर्चना असते. नवरात्रात देवीचा नऊ दिवस उत्सव साजरा केला जातो. अष्टमीला महालक्ष्मी पूजन होते व नवमीला नवचंडीयाग होऊन दसऱ्याला उत्सवाची समाप्ती होते.

रमा म्हणजेच महालक्ष्मी आणि अंबिका म्हणजेच पार्वती अशा दोन्ही देवतांचा संगम दर्शविणारी ही रमाम्बिका देवी आपल्या सर्वांना मांगल्य, शांती आणि ऐश्‍वर्य प्रदान करो.

– अपर्णा अभ्यंकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)