पुण्यात पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याच नाव घेत नाहीये. पुणेकरांच्या काळजात धड्की भरवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. औंधच्या नागरास रोडवर शुक्रवारी मध्यरात्री रफीक लाला शेख या युवकाची तरुणांनी हत्या केली आहे. जुन्या वादातून रफिकचा हत्या अली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून  परिसरात भीतीचं वातावरण असून परिसरात तनाव निर्माण झाल आहे.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर औन्ध मधील नागरस रोडवर घडलेल्या या घटनेत रफिक शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, सध्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रफिक हा रिक्षा चालवण्याचं काम करतो. त्याचे मित्रांशी काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून इम्रान शेख, शुभम भिसे, उमेश झा, इरफान शेख, युसूफ शेख, यांनी नागरस रोड वर उभ्या असलेल्या रफिकवर धारदार शस्त्राने वार करत हल्ला करत घटना स्थळावरून पळ काढला.

या घटनेबाबद मयत रफिकच्या भावाने पोलिसांकडे फिर्याद दिली असून चतरुशृंगी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.